दारू खरेदीसाठी वयोमर्यादा 18 वर्षांपर्यंत कमी करण्याच्या प्रस्तावावर विविध पक्षांनी आणि संघटनांना आक्षेप घेतल्यानंतर, कर्नाटकात सत्ताधारी भाजप सरकारने हा विचार मागे घेऊन 21 वर्षांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, कर्नाटकतील नागरिक, विविध संघटना आणि माध्यमांनी घेतलेल्या जोरदार आक्षेपांनंतर पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे कर्नाटक उत्पादन शुल्क विभागाने म्हटले आहे.
कर्नाटक उत्पादन शुल्क कायदा, 1965 च्या 36 (1) (जी) कलमानुसार कर्नाटकात 18 वर्षांखालील व्यक्तींनी दारूची खरेदी- विक्रीला प्रतिबंधित करते. तसेच, कर्नाटक उत्पादन शुल्काच्या नियम, 1967 च्या नियम 10(1) (ई) नुसार, 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना मद्यविक्री करण्यास मनाई आहे.
कर्नाटक सरकारच्या दाव्यानुसार कायदा आणि नियमांमधील वयाशी संबंधित हा विरोधाभास दूर करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे म्हटले आहे. या मसुद्याच्या नियमांवर परिणाम होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींच्या हरकती किंवा सूचनांसाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता.
त्यानंतर या निर्णयाविरूध्द कर्नाटकात नाराजी दिसून आली. राज्यातील राजकिय पक्ष आणि विविध संघटनांनी याचा तिव्र शब्दात निषेध केला. त्यानंतर सरकारने हा निर्णय मागे घेऊन तो 21 वर्षापर्यंत वाढवला. दारू खरेदीसाठी २१ वर्षांवरून १८ वर्षांपर्यंत कमी करणार्या या निर्णयाला जनता, संघटना आणि प्रसारमाध्यमांनी घेतलेल्या आक्षेपांचा विचार करून हा निर्णय मागे घेत असल्याचा उत्पादनशुल्क विभागाने म्हटले आहे.
Previous Articleरायगड येथील अपघातात कलंबिस्त गावची महिला जागीच ठार
Next Article दिलीप भालेकर यांचा व्यापारी संघातर्फे सत्कार !









