वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेचा माजी आंतरराष्ट्रीय पुरूष टेनिसपटू आंद्रे अॅगास्सी येत्या जानेवारीत भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. भारतामध्ये होणाऱ्या पिकलबॉल स्पर्धेला तो उपस्थित राहणार आहे.
माजी टेनिसपटू अॅगास्सीने एटीपी मानांकनात अग्रस्थान राखले होते. तसेच त्याने आठ ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकल्या असून त्यामध्ये चारवेळा ऑस्ट्रेलियन तर दोनवेळा अमेरिकन आणि प्रत्येकी एकदा विम्बल्डन व फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. पीडब्ल्युआर डीयुपीआर इंडियन टूर आणि लीगतर्फे ही पिकलबॉल स्पर्धा जानेवारीत होणार असून या स्पर्धेचे उद्घाटन अॅगास्सी करणार आहे.









