वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
अमेरिकेचा माजी आंतरराष्ट्रीय टेनिसपटू आंद्रे अॅगास्सीने पिकलबॉल या क्रीडा प्रकारात पदार्पण करण्याचे ठरविले आहे. पुढील आठवड्यात येथे होणाऱ्या अमेरिकन खुल्या पिकलबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत अॅगास्सी मिश्र दुहेरीत अॅना वॉल्टर्स समवेत सहभागी होत आहे.
पिकलबॉल या क्रीडा प्रकाराचा शोध 1965 साली अमेरिकेच्या एका गटाने लावला. या क्रीडा प्रकारासाठी प्लास्टीक बॉलचा वापर केला जातो. तसेच टेनिस आणि बॅडमिंटन या क्रीडाप्रकारामध्ये रॅकेटचा वापर या क्रीडा प्रकारात होतो. अॅगास्सीने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत 8 ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविली असून त्याने जर्मनीची जागतिक दर्जाची महिला टेनिसपटू स्टेफी ग्राफबरोबर विवाह केला होता.









