महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे समभाग 5 टक्क्यांनी वधारले : निफ्टी मजबूत
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारात गुरुवारच्या सत्रात पुन्हा एक दिवसाच्या बुधवारच्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला असून नव्या उंचीवर पोहोचला आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्सने 65,832.98 चा उच्चांक प्राप्त केला आहे. यासोबतच निफ्टीनेही मजबूत कामगिरी केली आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने गुरुवारच्या सत्रात दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 339.60 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.52 टक्क्यांच्या मजबूतीसह 65,785.64 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 98.80 अंकांसह 0.51 टक्क्यांच्या तेजीसह निर्देशांक 19,497.30 वर बंद झाला आहे.
या क्षेत्रांची चमक
गुरुवारच्या सत्रात बाजारामध्ये प्रामुख्याने ऊर्जा, ऑईल अॅण्ड गॅस आणि रियल्टी यांचे निर्देशांक हे जवळपास 2 टक्क्यांनी वधारुन बंद झाले. दुसऱ्या बाजूला वाहन आणि हेल्थकेअर क्षेत्रातील समभाग हे 1 टक्क्यांनी तेजीत राहिले. यावेळी बीएसईमध्ये मिडकॅपचा निर्देशांक 0.8 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला. यामध्ये स्मॉलकॅमचा निर्देशांक 0.7 टक्क्यांनी वधारला आहे. मुख्य कंपन्यांमध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांचे समभाग सर्वाधिक 4.97 टक्क्यांनी वधारुन बंद झाले. तसेच पॉवरग्रिड कॉर्प, टाटा मोर्ट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, नेस्ले इंडिया, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेन्ट्स, विप्रो आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये गुरुवारी मारुती सुझुकी, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, टाटा स्टील आणि इन्फोसिस यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.
अभ्यासकांच्या नजरेतून…
अभ्यासकांच्या मतानुसार गुरुवारी कॉन्सॉलिडेशननंतर ही तेजी आल्याचे म्हटले आहे. तसेच निफ्टीने पुन्हा एकदा नवीन विक्रमाला स्पर्श केले आहे. यामुळे बाजारात एकूणच उत्साहाचे वातावरण राहिले होते. यामुळे काही निवडक कंपन्यांच्या कामगिरीने बाजारात नवा विक्रम नोंदवला आहे.
रुपया घसरणीत
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये गुरुवारी नकारात्मक स्थिती राहिली होती. डॉलरच्या तुलनेत रुपया 27 पैशांनी घसरुन 82.49 वर बंद झाला आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- महिंद्रा आणि महिंद्रा 1548
- अपोलो हॉस्पिटल 5283
- पॉवरग्रिड कॉर्प 262
- टाटा मोटर्स 600
- रिलायन्स 2638
- बीपीसीएल 393
- एनटीपीसी 196
- ओएनजीसी 165
- ब्रिटानिया 5173
- अॅक्सिस बँक 980
- कोल इंडिया 234
- हिंडाल्को 426
- सिप्ला 1021
- डॉ. रे•िज लॅब्स 5231
- नेस्ले 23099
- एशियन पेंटस् 3399
- लार्सन टुब्रो 2488
- कोटक महिंद्रा 1877
- विप्रो 396
- बजाज ऑटो 4917
- जेएसडब्ल्यू स्टील 795
- हिरो मोटोकॉर्प 3172
- युपीएल 672
- अल्ट्राटेक सिमेंट 8410
- बजाज फिनसर्व्ह 1619
- टेक महिंद्रा 1179
- भारती एअरटेल 869
- एसबीआय 592
- टायटन 3106
- अदानी एंटरप्रायझेस 2402
- आयसीआयसीआय 959
- एसबीआय इन्शु. 1292
- एचडीएफसी बँक 1675
- टीसीएस 3322
- एचयुएल 2757
समभाग घसरलेल्या कंपन्या
- आयशर मोटर्स 3222
- एचडीएफसी लाइफ 661
- मारुती सुझुकी 9859
- एचसीएल टेक 1180
- बजाज फायनान्स 7766
- इंडसइंड बँक 1390









