Kolhapur News: प्रतापगडावरील खानाच्या कबरीवरील अतिक्रमण काढल्याने कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवप्रेमींनी शिंदे सरकार आणि फडणवीस सरकारचं अभिनंदन केलं.यापुढे राज्यातील गडकिल्ल्यांवर अतिक्रमण होऊ देणार नाही,झाल्यास ही अतिक्रमण हटवू असा इशारा दिला. विशाळगडावरील अतिक्रमण कधी हटवणार? असा सवाल शिवप्रेमींनी केला आहे. तसेच विशाळगडावरील अतिक्रमण न हटवल्यास स्वतः हटवण्याचा इशारा दिला. या लढाईतील आंदोलनकर्त्यांचा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला.
प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाची कबर आहे. सुरूवातीला ही कबर काहीच फूट जागेत होती. मात्र, त्याठिकाणी असलेल्या वनविभागाच्या एकरभर जागेवर अतिक्रमण करण्यात आलं. त्यामुळे याठिकाणी अफजलखानाचं उदात्तीकरण केलं जात असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. हे अतिक्रमण काढावं यासाठी २००६ मध्ये स्थानिकांनी आंदोलनही केलं होतं.कबरीजवळील अवैध बांधकाम पाडा असे, आदेश असताना देखील आतापर्यंत स्थानिक प्रशासनाने याबाबत कुठलीही कारवाई केली नव्हती. अखेर आज जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने मिळून संयुक्तपणे कबरीजवळील अतिक्रमण पाडण्यास सुरूवात केली आहे.याचा आनंद आज कोल्हापुरात शिवप्रमींनी साजरा केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









