ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाला उभारी देण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न सुरू आहेत. छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातील सभेनंतर आता बीडमध्ये शरद पवार सभा घेणार आहेत. 17 ऑगस्टला ही सभा होणार असून, संदीप क्षीरसागर यांच्याकडे या सभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या आज झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
2 जुलैला अजित पवार यांच्यासह जवळपास 40 आमदारांनी राष्ट्रवादीत बंड करत युती सरकारला पाठिंबा दिला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या बंडानंतर शरद पवारांनी लढय़ाची भूमिका घेतली आहे. त्यांनी पक्षाला उभारी देण्यासाठी पहिली सभा येवल्यात घेतली. आता 17 ऑगस्टला ते बीडमध्ये सभा घेणार आहेत.








