नगरसेविका वैशाली भातकांडे यांचा पाठपुरावा
बेळगाव : महाद्वार रोड ते कपिलेश्वर मंदिर या परिसरात मागील अनेक वर्षांपासून गटारींची समस्या निर्माण झाली होती. तब्बल 12 वर्षांनी गटारीच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. स्थानिक नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या प्रयत्नातून गटार बांधणीच्या कामाला गती मिळाली. मंगळवारी त्यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. महाद्वार रोड परिसरात गटारीची व्यवस्था नसल्यामुळे पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरत होते. सांडपाणी घरामध्ये शिरत असल्याने नागरिकांनी अनेकवेळा नाराजी व्यक्त केली होती. नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी महापालिकेत या समस्येबाबत पाठपुरावा केला. एकूण 12 लाख रूपये मंजूर करून कामाला सुरुवात झाली. यामुळे नागरिकांनी वैशाली भातकांडे यांचे आभार मानले.









