महाराष्ट्र-कर्नाटक सीमा विवादाचा ठराव विधानसभेत लांबणीवर पडल्यावर शिवसेना (ठाकरे गटाचे ) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्राने वादग्रस्त सीमाभाग भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणी करून आम्हाला कर्नाटकची एक इंचही जमीन नको पण आम्हाला आमची जमीन परत हवी आहे अशी मागणी केली. तसेच महाराष्ट्र सरकारने कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणी केंद्राकडे करायला हवी असेही मत व्यक्त केले.
जूनमध्ये मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर प्रथमच विधान परिषदेला संबोधित करताना ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भाग हा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यासाठी केंद्रशासनाकडे पाठपुरावा करावा. आणि यासाठी तसा ठराव महाराष्ट्र विधान परिषदेने मंजूर करावा, तसेच वादग्रस्त सीमा भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यासाठी सभागृहाने केंद्राकडे आपली मागणी केली पाहिजे.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “आम्हाला कर्नाटकची एक इंचही जमीन नको आहे, पण आम्हाला आमची जमीन परत पाहीजे. कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणी केंद्राकडे करावी आणि हा ठराव “आजच” पारित करून केंद्राकडे पाठवा.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








