हॉर्नबिल पक्ष्याची अनोखी प्रेम कहाणी
प्रेम एक पवित्र बंधन असून ज्याने जगालाही आजही जोडून ठेवले आहे. प्रेम ही भावना नकारात्मकता दूर करण्यासाठी पुरेशी असते. आजपर्यंत अनेक जणांच्या प्रेम कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील, परंतु अशाप्रकारचे प्रेम केवळ माणसांमध्ये नव्हे तर प्राणी-पक्ष्यांमध्येही दिसून येते.
भारतातील अनेक राज्यांमध्ये हॉर्नबिल हा पक्षी आढळून येतो. या पक्ष्याला ‘जंगलाचा माळी’ देखील म्हटले जाते. हा पक्षी स्वतःच्या प्रेमासाठी जगभरात ओळखला जातो. हॉर्नबिल पक्षी हा आययुसीएन रेड लिस्टमध्ये देखील सामील आहे. या पक्ष्याचे आर्युमान 50 वर्षांपर्यंत असते. सर्वसाधारणपणे हा पक्षी एकाच जोडीदारासोबत राहतो आणि प्रवासही एकत्रच करतात. घरटं वसविताना देखील ते त्यासाठीच्या जागेचा शोध एकत्रच घेत असतात.
मादी पक्षी घरटय़ात होतो कैद
मादी हॉर्नबिल पक्षी स्वतःच्या पिल्लांसाठी 3-4 महिन्यांकरता घरटय़ांमध्ये कैद होत असते. अन्नासाठी केवळ एक लहान छिद्र खुले राहते, याचमुळे हॉर्नबिल पक्षी अत्यंत विचारपूर्वक घरटय़ासाठी जागा शोधत असतो. मादी हॉर्नबिल घरटय़ात कैद असेपर्यंत नर हॉर्नबिल तिला स्वतःच्या चोचेद्वारे अन्न देत राहतो. तर अंडय़ातून पिल्लू बाहेर पडल्यावर नर पक्ष्याला अधिक अन्न आणण्याची गरज भासते.

नर पक्षी न परतल्यास परिवाराचा मृत्यू
एका नर हॉर्नबिलवर स्वतःच्या पूर्ण परिवाराची जबाबदारी असते. नर पक्ष्याला सर्वांच्या अन्नाची व्यवस्था करावी लागते. खाद्यासाठी तो घरटय़ापासून फार अंतरावर जाऊ शकत नाही कारण त्याला घरटय़ाची सुरक्षाही करावी लागते. नर हॉर्नबिल घरटय़ात न परतल्यास त्याचा पूर्ण परिवार संपून जातो. अनेकदा अन्नाच्या प्रतीक्षेत मादी हॉर्नबिल आणि त्यांच्या पिल्लांचा मृत्यू होत असतो.
जंगलनिर्मितीत योगदान
हॉर्नबिल पक्षी फळांना खातेवेळी ती पूर्ण गिळत असतात. हॉर्नबिल मादी आणि मुलांसाठी अन्न नेताना ही फळे खाली पडतात. अशा प्रकारे अनेकप्रकारच्य फळांचे बीज जमिनीवर पडते. विशेषकरून हॉर्नबिलच्या घरटय़ानजीक हा प्रकार अधिक आढळून येतो. याचमुळे या पक्ष्याला ‘जंगलाचा शेतकरी’ म्हटले जाते.









