रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत होणार होते डबे वाजवा आंदोलन
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सावंतवाडी- आंबोली -बेळगाव हा मार्ग तसेच सर्व रस्त्यांची झालेली स्थिती या विरोधात मनसेनेने 30 ऑक्टोबरला डबे वाजवा आंदोलन पुकारले होते. मात्र आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री केणी यांनी रस्त्यांची योग्य पद्धतीत डागडुजी व दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन तूर्तास स्थगित ठेवण्यात येत आहे. असे पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार परशुराम उपरकर यांनी स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार,मंदार नाईक,सुरेंद्र कोठावळे,स्वप्निल कोठावळे,विजय जांभळे,नंदू परब,स्वप्निल जाधव ,गीरगोल दिया मनोज कांबळी, निलेश देसाई ,आबा चिपकर ,प्रवीण गवस , प्रकाश साटेलकर , प्रणित तळकर ,मयूर पालकर आदी उपस्थित होते .









