सार्वजनिक बांधकामकडून कार्यवाही
न्हावेली / वार्ताहर
मळगाव इंग्लिश स्कुल मळगाव हायस्कुलच्या समोर गतिरोधक घातले नसल्याकारणाने हायस्कुलच्या समोर अपघाताचे प्रमाण वाढले होते . बऱ्याच जणांनी गतिरोधक घालण्याच्या या मागणीला जोर धरला होता ही बाब मनसेचे पदाधिकारी सुधीर राऊळ राकेश परब व कार्यकर्त्यांच्या गावातल्या लोकांनी आणि शिक्षकवर्गाने निदर्शनास आणून दिले त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक विभाग सावंतवाडी यांना निवेदन देऊन गतिरोधक घालण्यास सांगितले तसेच बांधकाम विभागाने सहकार्य करुन दुसऱ्या दिवशी हायस्कुलच्या समोर गतिरोधक घालून दिले त्यावेळी समोर उभे राहून मळगाव इंग्लिश स्कुल मळगावचे चेअरमन मनोहर राऊळ आणि गावातील लोकांनी भर पावसात गतिरोधक व्यवस्थित बसवून घेतले आणि हे गतिरोधक लवकरात लवकर घालून घेतल्यामुळे गावातील ग्रामस्थ हायस्कुल कमिटी शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी मनसे कार्यकर्त्यांचे आभार मानले .









