कंपनीची भारतात35 डिलरशिप उघडण्याची योजना
वृत्तसंस्था/ सुरत
एलॉन मस्कच्या टेस्ला नंतर, आता व्हिएतनामच्या इलेक्ट्रिक उत्पादक विनफास्टने गुजरातमधील सुरत येथे भारतात आपले पहिले शोरूम उघडले आहे. 3,000 चौरस फूट शोरूमचे उद्घाटन रविवारी करण्यात आले.
भारताच्या इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) बाजारपेठेत आपली उपस्थिती प्रस्थापित करण्यासाठी विनफास्टसाठी हे शोरूम एक मोठे पाऊल आहे. विनफास्टच्या आगामी प्रीमियम इलेक्ट्रिक कार्स एसयूव्ही- व्हीएफ6 आणि व्हीएफ 7 7 या शोरूममध्ये प्रदर्शित केल्या जातील. भारत ही अशी पहिली बाजारपेठ आहे जिथे विनफास्ट व्हीएफ 6 आणि व्हीएफ 7 च्या आवृत्त्या लाँच केल्या जात आहेत.
27 हून अधिक शहरांमध्ये डिलरशिप योजना
विनफास्टची या वर्षाच्या अखेरीस भारतातील 27 हून अधिक शहरांमध्ये 35 डिलरशिप उघडण्याची योजना आहे. ही वाहने तामिळनाडूतील थुथुकुडी येथे असलेल्या कंपनीच्या आगामी उत्पादन प्रकल्पात जोडणी केली जातील. ग्राहक कंपनीच्या वेबसाइट न्ग्हइastAल्tद.ग्ह ला भेट देऊन आणि 21,000 रुपये (परत करण्यायोग्य) जमा करून शोरूममध्ये त्यांची कार बुक करू शकतात.
भारत कंपनीसाठी धोरणात्मक बाजारपेठ
विनफास्टने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘तामिळनाडूतील थुथुकुडी येथे लवकरच एक कारखाना स्थापन केला जाईल. या कारखान्यात ही वाहने असेंबल केली जातील. भारत ही कंपनीसाठी एक धोरणात्मक बाजारपेठ आहे. भविष्यात भारताला इलेक्ट्रिक वाहन उत्पादन केंद्र बनवण्याची कंपनीची दीर्घकालीन वचनबद्धता आहे.’
विनफास्ट आशियाचे सीईओ फाम सानह चाऊ म्हणाले, ‘सुरत, गुजरातमधील पहिले विनफास्ट शोरूम भारताप्रती आमची वचनबद्धता दर्शवते. विनफास्टचा अनुभव भारतीय ग्राहकांपाशी आणण्यास आम्ही उत्सुक आहोत. गुजरातमधील डिलरशिपसह, आमचे लक्ष्य केवळ इलेक्ट्रिक वाहने प्रदान करणे नाही तर गुणवत्ता, विश्वास प्राप्त करणे आहे.









