पुणेपाठोपाठ आता मुंबईतही दोन शाळांकडे सीबीएसईचं बोगस प्रमाणपत्र असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यातल्या पाच शाळांना सीबीएसईचं बोगस प्रमाणपत्र देण्याचा प्रकार घडला असल्याची धक्कादायक माहिती शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिली.
एका खासगी माध्यमावर बोलताना औदुंबर उकिरडे म्हणाले की, राज्यातील पाच शाळांना सीबीएसईचं बोगस प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. शिक्षण उपसंचालक यांच्याकडून मंत्रालयात अहवाल पाठवला जाईल. त्यानंतर संबंधीत प्रकरणी दोषींवर कारवाई होईल. शिक्षण विभागाकडून राज्यभरातील ६६६ सीबीएसई शाळांची चौकशी करण्यात आलीयं. यांमध्ये पाच शाळांचे एऩओसी आदेश बनावट असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली असून एऩओसी बनावट असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलय.
Previous Articleएंजल फाऊंडेशन तर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
Next Article बेळगाव महापौर, उपमहापौरपदाचे आरक्षण जाहीर









