राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्य़ांमध्ये एकच खळबळ माजली. नविन अध्यक्ष निवडण्यासाठी गठीत केलेल्या समिती एकमताने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला. कार्यकर्त्यांनी आणि पक्षाच्या नेत्यांनी शरद पवारांच्या या निर्णयाला विरोध करून निर्णय मागे घेण्यासाठी आंदोलन केल्यानंतर तुम्हाला निराश होऊ देणार नाही असे आवाहन केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकारी यांच्यासह शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपण राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले. तसेच आपण यापुढे पक्षासाठी पुन्हा जोमाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या पत्रकारपरिषदेत बोलताना ते म्हणाले, “मी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण पक्षाच्या कार्यकर्त्यांना हा निर्णय रुचलेला नाही. या निर्णयावरुद्ध त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या भावनांना मान राखून मी माझा निर्णय मागे घेत आहे. राजीनामा मागे घेतल्यानंतर मी पक्षाचे काम जोमाने चालवणार आहे.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
पुढे बोलताना त्यांनी “माझ्या निर्णयानंतर मला पक्षाच्या आणि सहकारी पक्षाच्या नेत्यांनीही या निर्णयाचा विचार करावा असे आवाहन केले होते. शिवसेनेसह कॉंग्रेस पक्षातील अनेक जेष्ठ नेत्यांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी विनंती केली होती.”
आपल्या निर्णयाची कल्पना अजित पवारांना असल्याचे सांगताना त्यांनी “हा निर्णय आपण कुटुंबासोबत चर्चा करूनच घेतला होता. याबाबत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनाही कल्पना होती.” असे ते म्हणाले.
पक्षात संघटनात्मक बदल करण्यासाठी पाउले उचलणार असल्याचे सांगताना त्यांनी “पक्षात उत्तराधिकारी तयार व्हायला हवा. तसेच नविन लोकांना संधी मिळायला हवी. यासाठी पक्षात संघटनात्मक बदल करणे गरजेचे आहे. काही लोकांना राज्यपातळीवर आणले पाहीजे. राज्य पातळीवरिल काही लोकांना केंद्रीय स्तरावर संधी मिळाली पाहीजे” असे मत त्यांनी व्यक्त केले.








