राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्तीचा घोषणा केल्यानंतर राज्यासह देशभरात राष्ट्रवादी नेते- कार्यकर्त्यांसह खळबळ माजली. शरद पवार यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा यासाठी देशभरातून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले गेले.
आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका स्पष्ट केली. “मी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण पक्षाच्या कार्यकर्त्यांना हा निर्णय रुचलेला नाही. या निर्णयावरुद्ध त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या भावनांना मान राखून मी माझा निर्णय मागे घेत आहे. राजीनामा मागे घेतल्यानंतर मी पक्षाचे काम जोमाने चालवणार आहे.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.