वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळची राजधानी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे शनिवारी संध्याकाळी अचानक उड्डाणे थांबवण्यात आली. धावपट्टीवरील प्रकाश व्यवस्था यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने सर्व उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली. ही समस्या स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 5:30 च्या सुमारास उद्भवल्यामुळे येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व उड्डाणांना विलंब झाला. यापूर्वी गेल्या दोन दिवसात भारतातील दिल्ली विमानतळावरही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामुळे अनेक विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला होता.
नेपाळमधील रनवेवरील हवाई क्षेत्रावरील प्रकाश व्यवस्था यंत्रणेत समस्या आली आल्यामुळे काही विमानांचे उड्डाण थांबवावे लागले. परिणामत: सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांना विलंब होत असल्याचे विमानतळाचे प्रवक्ते रेंजी शेर्पा यांनी सांगितले. विमान उड्डाणे पुन्हा सुरू करण्यासाठी आणि बिघाड लवकर दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक विभागातील कर्मचारी काम करत होते. मात्र, ही समस्या नेमकी कशामुळे निर्माण झाली याची माहिती तातडीने उपलब्ध होऊ शकली नाही.
काठमांडूचे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नेपाळचे एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. येथून दररोज शेकडो उ•ाणे सेवेत सक्रीय होत असल्याने देशाच्या पर्यटन आणि व्यापारासाठी एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते.









