ओनलाईन टीम/तरुण भारत
देशात कोरोना (corona) रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. दिल्लीत (delhi) रुग्ण वाढत असताना प्रशासनाने नागरिकांना मास्क अनिवार्य केला आहे. आता दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्येही (punjab) मास्क (mask) सक्ती करण्यात आली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोविड -१९ (covid19) शी संबंधित निर्बंध आणि मार्गदर्शक तत्त्वे पुन्हा एकदा जारी करण्यात येणार आहेत. (After Delhi, mask is now compulsory in Punjab)
राज्यात वाढत्या कोरोना रुग्णाचा विचार करता पंजाब सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य केले आहे. गुरुवारी जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड-१९ च्या प्रकरणांमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पंजाब सरकारने आज जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये, बस, ट्रेन, विमान, टॅक्सी इत्यादी सार्वजनिक वाहतुकींमध्ये मास्क लावण्याची सक्ती केली आहे. तसेच सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, शाळा-महाविद्यालये, कार्यालये आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे.