डांबरीकरणामुळे स्ता चकाचक, दुतर्फा सुशोभीकरणही
पणजी : राजधानी पणजीत स्मार्ट सिटी अंतर्गत काही ठिकाणी सुरू असलेल्या कामामुळे काही रस्ते ख•sमय परिस्थितीत असले तरी शहरातील काही रस्त्यावर डांबर चढल्याने चकाचक दिसत आहेत. शहरातील मुख्य चर्च परिसरातून जाणाऱ्या कोर्तीन उतरणीचा रस्ता संपूर्णपणे डांबरीकरण करण्यात आल्यामुळे सुमारे 15 वर्षांनी या रस्त्याचे भाग्य उजळले आहे मुख्य चर्च परिसरातून जाणाऱ्या कोर्तीन रस्त्यावर डांबर घालण्याबरोबरच दुतर्फा असलेल्या फुटपाथवरही रंगीबेरंगी पेव्हर्स घालण्यात आले आहे. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या गटारांचे काम करून त्या सुस्थितीत आणल्या आहेत. तसेच रस्त्याच्या दुतर्फा नव्याने पथदीप घालण्यात आल्याने रात्रीच्यावेळी या परिसरातून जाताना वाहनचालक व नागरिक यांना वेगळाच अनुभव येत आहे. वास्तविक कोर्तीन रस्त्यावरून पणजी बसस्थानक, मळा पणजी, सांताक्रुझ या भागातील नागरिक नेहमी ये-जा करतात. पोर्तीन रस्ता येथील नागरिकांनी मुख्य असून, अनेक परिसरातील नागरिकांना याच रस्त्याचा आधार घ्यावा लागतो. पंधरा वर्षांपूर्वी या रस्त्यावर डांबर घालण्यात आले होते. थ्यानंतर मात्र केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्यात येत होती. परंतु जी-20 शिखर परिषदेची तिसरी बैठक होण्यापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण व बाजूचे सुशोभीकरण करून नक्कीच संबंधित खात्याने कौतुकास्पद काम केल्याच्या भावना नागरिकांनी व वाहनचालकांनी व्यक्त केल्या.
इतर रस्त्यांचेही व्हावे डांबरीकरण
राजधानी पणजीला ‘रातराणी’ असेही म्हटले जाते. पणजीचे देखणे ऊप पर्यटकांना नेहमीच भुरळ घातले. परंतु सध्या विविध कामांसाठी अंतर्गत रस्त्यांची झालेली वाताहत, अनेक ठिकाणी पडलेले ख़•s यामुळे कुठेतरी पणजीची अवस्था बकाल वाटते. म्हणून शहरातील अंतर्गत रस्तेही डांबरीकरणाद्वारे चकाचक करावेत, अशी पणजीवासीयांची व वाहनचालकांची मागणी आहे. पावसाळा तोंडावर आल्याने वेळीच ख़•s बुजवून डांबरीकरण करण्याची गरज आहे, अन्यथा पावसाळ्यात अनेकजणांना अपघातांना सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.









