रियान रिकेल्टन ‘सामनावीर’, लिझाद विलियम्सचे 4 बळी
वृत्तसंस्था / अबु धाबी
‘सामनावीर’ड रियान रिक्लेटोनचे दमदार अर्धशतक तसेच विलियम्सच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर येथे झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात द. आफ्रिकेने आयर्लंडचा 139 धावांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली.
या सामन्यात द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 271 धावा जमविल्या. त्यानंतर आयर्लंचा डाव 31.5 षटकात 132 धावांत आटोपला. द. आफ्रिका संघातील सलामीचा फलंदाज रिक्लेटोनने 102 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांसह 91 तर स्टब्जने 86 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह 79 धावा जमविल्या. प्रत्युत्तरादाखल दाखल खेळताना आयर्लंडच्या डावामध्ये एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. द. आफ्रिकेच्या विलियम्सने 32 धावांत 4 तर एन्गिडी आणि फॉर्च्युन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. अलिकडेच झालेल्या टी-20 मालिकेत आयर्लंडने द. आफ्रिकेला 1-1 असे बरोबरीत रोखले होते.
द. आफ्रिकेच्या डावामध्ये रिक्लेटोन आणि स्टब्ज यांनी दमदार अर्धशतके झळकविली. फॉर्च्युनने 34 चेंडूत 2 चौकारांसह 28, विलियम्सने 2 चौकारांसह 13, मुल्डेरने 1 चौकारांसह 11, एन्गिडीने 1 षटकार आणि 1 चौकारासह 20 तर झोर्जीने 1 चौकारासह 12 धावा जमविल्या. आयर्लंडतर्फे मार्क अॅडेरने 50 धावांत 4 तर यंगने 45 धावांत 3 तसेच हुमे आणि मॅकब्रीने यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. द. आफ्रिकेच्या डावात 8 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. द. आफ्रिकेने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 39 धावा जमविताना 3 गडी गमविले. दुसऱ्या पॉवरप्लेमध्ये त्यांनी 169 धावांत 3 गडी गमविले. तसेच शेवटच्या 10 षटकात त्यांनी 63 धावा जमविताना 3 गडी गमविले. रिक्लेटोनने आपले अर्धशतक 74 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने तसेच स्टब्जने आपले अर्धशतक 62 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने नोंदविले. मार्क अॅडेरने 4 तर यंगने 45 धावांत 3 तसेच हुमे आणि मॅकब्रीने यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडच्या डावात सलामीच्या बेलबिरेनीने 28 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 20, कॅम्फरने 36 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 20, डॉक्लेरने 32 चेंडूत 2 चौकारांसह 21, मॅकब्रीनेने 14, मार्क अॅडेरने 14, टेक्टरने 12 तर यंगने नाबाद 12 धावा जमविल्या. द. आफ्रिकेच्या विलियम्सने 4, तर एन्गिडी, फॉर्च्युन यांनी प्रत्येकी 2 तसेच बार्टमन व मुल्डेर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. आयर्लंडच्या डावात 3 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडचे पहिले पाच फलंदाज 15 षटकातच तंबूत परतले होते. आयर्लंडने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 43 धावा जमविताना 2 गडी गमविले. दुसऱ्या पॉवरप्लेमध्ये त्यांनी 89 धावांत 8 गडी गमविले.
संक्षिप्त धावफलक: 50 षटकात 9 बाद 271, (रिक्लेटोन 91, स्टब्ज 79, फॉर्च्युन 28, विलियम्स 13, एन्गिडी नाबाद 20, मुल्डेर 11, झोर्जी 12, अवांतर 9, मार्क अॅडेर 4-50, यंग 3-45, मॅकब्रिने व हुमे प्रत्येकी एक बळी), आयर्लंड 31.5 षटकात सर्वबाद 132 (बेलबिरेनी 20, कॅम्फर 20, ट्रेक्टर 12, डॉक्रेल 21, मार्क अॅडेर 12, मॅकब्रीने 14, यंग नाबाद 12, अवांतर 6, विलियम्स 4-32, एन्गिडी 2-35, फॉर्च्युन 2-28, बार्टमेन आणि मुल्डेर प्रत्येकी 1 बळी)









