वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अफगाण क्रिकेट संघातील डावखुरा वेगवान गोलंदाज शापूर झेद्रानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा शुक्रवारी केली. अफगाण संघातील झेद्रानने 2009 साली आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले होते.
त्याने आतापर्यंत 44 वनडे आणि 36 टी-20 सामन्यात अफगाणचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2015 साली झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत झेद्रानने दर्जेदार कामगिरी केली होती. त्याने या स्पर्धेत 10 गडी बाद केले होते.









