वृत्तसंस्था/ गयाना
मंगळवारी होणार असलेल्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानाची गाठ गयाना येथील प्रोव्हिडन्स येथे युगांडाशी पडणार असून यावेळी निश्च़ितपणे अफगाणिस्तान वर्चस्व गाजवेल. आफ्रिकन संघ या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळत आहेत. अफगाणिस्तानने मागील आयसीसी स्पर्धेत अतिशय चांगली कामगिरी केली होती. गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या संघांना पराभूत करून दाखविले. या स्पर्धेतही ते नक्कीच मनापासून खेळण्याचा आनंद घेतील आणि धक्कादायक विजयांची नोंद करण्याचा प्रयत्न करतील.
सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वा.









