वृत्तसंस्था/ अबुधाबी
आज गुऊवारी येथे होणार असलेल्या श्रीलंकेविऊद्धच्या आशिया कप गट सामन्यात अफगाणिस्तानला अधिक उत्साहाने आणि स्वातंत्र्य घेऊन खेळावे लागेल. बांगलादेशविऊद्धच्या पराभवानंतर अफगाणिस्तानला सुपर फोरमध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टीने स्थिर श्रीलंकेला मागे टाकावे लागेल. अफगाणिस्तानचा विजय त्यांना श्रीलंका आणि बांगलादेशप्रमाणे प्रत्येकी चार गुणांवर आणेल.
तथापि, त्यांच्या बाजूने जे काही जाऊ शकते ते म्हणजे बांगलादेशच्या (उणे 0.270) तुलनेत त्यांचा नेट रन रेट (2.150) जास्त चांगला आहे आणि बांगलादेशचे प्राथमिक सतरावरील सामने संपले आहेत. टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर रशिद खानच्या नेतृत्वाखालील संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांच्या फिरकी गोलंदाजांनी भरलेल्या संघाला, विशेषत: फलंदाजीला अद्याप सर्वोत्तम फॉर्म मिळवता आलेला नाही.
मंगळवारी रात्री बांगलादेशविऊद्ध अफगाणिस्तान 155 धावांचा पाठलाग करेल, अशी अपेक्षा होती. परंतु ते अडचणीच्या स्थितीत अकडले आणि त्यातून कधीही बाहेर पडू शकले नाहीत. ‘आम्ही ज्या प्रकारच्या आक्रमक क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहोत त्या प्रकारचा खेळ आम्ही केलेला नाही. आम्ही स्वत:वर खूप दबाव येऊ दिला. आम्ही ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि त्यांना 160 च्या आत रोखले ते खास होते, परंतु फलंदाजीमध्ये आम्ही काही बेजबाबदार फटके खेळलो. टी-20 मध्ये कधी कधी विरोधी संघ पहिल्या सहा षटकांतच ` तुमच्या हातून सामना नेतो, पण नंतर तुम्हाला पुनरागमन करावे लागते’, असे पराभवानंतर स्पष्टपणे निराश दिसलेल्या रशिदने सांगितले.
दोन्ही सामने जिंकलेल्या श्रीलंकेलाही फलंदाजीमध्ये सुधारणांची अपेक्षा असेल. हाँगकाँगविऊद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांनी स्वत:ला अनिश्चित परिस्थितीत ढकलले. कर्णधार चरिथ असलंकाला माहित आहे की, त्यांना दुखावलेल्या अफगाणिस्तानविऊद्ध अधिक सतर्क राहावे लागेल. त्यांच्या फलंदाजांना अफगाणिस्तानच्या स्टार फिरकीपटूंकडून जोरदार आव्हान मिळेल, तर अफगाणिस्तानला आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केलेला फिरकीपटू वानिंदू हसरंगाला कसे खेळायचे तो मार्ग शोधावा लागेल. पथुम निस्सांका, कुसल मेंडिस आणि कामिल मिशारा यांचा समावेश असलेली श्रीलंकेची वरची फळी चांगल्या स्थितीत आहे. मेंडिसला अजून हवी तशी चमक दाखविता आलेली नाही आणि तो गुऊवारी रात्री तसे करण्यास आणि आपल्या संघाला सुपर फोरमध्ये पोहोचविण्यास उत्स्gढक असेल.
संघ : श्रीलंका : चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल पेरेरा, नुवानिडू फर्नांडो, कामिंदू मेंडिस, कामिल मिशारा, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, चमिका कऊणारत्ने. महेश थीक्षाना, दुष्मंथा चमीरा, बिनुरा फर्नांडो, नुवान तुषारा, मथीशा पाथिराना.
अफगाणिस्तान : रशिद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, दरविश रस्रुली, सेदीकुल्लाह अटल, अजमतुल्ला उमरझाई, करीम जनात, मोहम्मद नबी, गुलबद्दीन नायब, शरफुद्दीन अश्रफ, मोहम्मद इशाक, नूर अहमद, मुजीब उर रहमान, ए. एम. गझनफर, फरीद अहमद मलिक, फजलहक फारूकी, नवीन उल हक
सामन्याची वेळ : रात्री 8 वा.









