ऑनलाईन टीम
दहशतीच्या बळावर तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर अखेर ताबा मिळवला. यानंतर अफगाणिस्तानातून अनेक नागरिकांनी देश सोडला. सर्वच देशांनी आपापल्या नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न केले. यानंतरच्या घडामोडीनंतर आज अमेरिकेनेही अफगाणिस्तानातील आपले सैन्य माघारी घेतले आहे. अफगाणिस्तानातील या परिस्थितीनंतर याचे पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर होतानाचे चित्र आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे राज्य स्थापन झाल्यानंतर, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत महत्वाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या ठरावामध्ये अफगाणिस्तानची जमीन इतर कोणत्याही देशाविरुद्धच्या कारवाईसाठी वापरू नये अशी मागणी करण्यात आली आहे. हा ठराव मंजूर करण्यात भारताने मध्यवर्ती भूमिका बजावली आहे.
५ स्थायी आणि १० अस्थायी सदस्य असलेल्या संघटनेने हा ठराव मंजूर केला आहे. तालिबानने त्यांच्या आश्वासनांची पूर्तता केली पाहिजे आणि अफगाणिस्तानची जमीन कोणत्याही देशाविरुद्ध वापरली जाणार नाही याची खात्री करायला हवे असे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने म्हटले आहे.
अफगाणिस्तान आता पूर्णपणे तालिबानाच्या ताब्यात आहे. यामुळे अफगाणिस्तानमधील बदलत्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक टास्क फोर्स तयार केली आहे. भारताचे मुख्य प्राधान्य हे अफगाणिस्तानमध्ये अजूनही अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे हे आहे. तसेच भारताने अफगाणिस्तानमधील मोठी गुंतवणूक केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









