वृत्तसंस्था/ लंडन
येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एएफसी यू-17 आशियाई चषक पात्रता फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद एकूण सात देशांना मिळणार असून भारत हा त्यापैकी एक देश आहे. 22 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा अहमदाबादमध्ये होणार आहे.
एका एरेना येथे या स्पर्धेतील सर्व सामने खेळविण्यात येतील. या पात्रता स्पर्धेचा ड्रॉ 7 ऑगस्ट रोजी काढण्यात येणार आहे. क्वालिफायर्समध्ये एकूण 38 देशांचा सहभाग असून त्यांचे एकूण सात गट करण्यात येतील. त्यापैकी सहा संघांचे तीन तर पाच संघांचा समावेश असलेले चार गट असतील. गटविजेता संघ 2026 मध्ये सौदी अरेबियात होणाऱ्या एएफसी यू-17 आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र ठरतील. कतरमधील फिफा यू-17 विश्वचषक 2025 स्पर्धेतील याआधीच थेट पात्र ठरलेले 9 संघही सौदी अरेबियातील स्पर्धेत सहभागी होतील.
क्वालिफायर्समधील 38 संघ सहा पॉट्समध्ये त्यांचे मानांकन व नियमानुसार विभागण्यात येतील. 2025, 2023, 2018 या मागील स्पर्धांतील त्यांची कामगिरी विचारात घेऊन ही विभागणी करण्यात येईल. भारताचा पॉट 2 मध्ये समावेश असून त्यांचा जादाच्या यजमान पॉटमध्येही ड्रॉसाठी समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक यजमान संघ वेगळ्या गटात असावा यासाठी ही सोय करण्यात आली आहे. चीन, व्हिएतनाम, थायलंड, म्यानमार, कीर्गीझ प्रजासत्ताक व जॉर्डन हे या पात्रता स्पर्धेचे अन्य यजमान असल्याने त्यांना भारताच्या गटात स्थान देण्यात आलेले नाही. क्वालिफायर्ससाठी करण्यात आलेले गट पुढीलप्रमाणे आहेत.
पॉट 1 : ऑस्ट्रेलिया, येमेन, इराण, ओमान, थायलंङ
पॉट 2 : अफगाण, मलेशिया, इराक, बांगलादेश, लाओस, कुवैत.
पॉट 3 : सिंगापूर, बहरिन, फिलिपिन्स, तुर्कमेनिस्तान, पॅलेस्टाईन.
पॉट 4 : सिरिया, मंगोलिया, कंबोडिया, हाँगकाँग, चिनी तैपेई, ब्रुनेई दारुसलाम.
पॉट 5 : नेपाळ, नॉर्दर्न मारियाना आयलँड्स, गुआम, मालदिव्ज, तिमोर-लेस्टे, लेबनॉन.
पॉट 6 : मकाव, श्रीलंका, पाकिस्तान
यजमान पॉट : चीन, व्हिएतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, कीर्गीझ प्रजासत्ताक, जॉर्डन.









