पॉझिटिव्ह असल्यास सात दिवस क्वारंटाईन, लक्षणे गंभीर असल्यास इस्पितळात उपचार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता भारतीय लष्कराने एक ऍडव्हायझरी जारी केली आहे. यामध्ये जवानांना मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग यांसारख्या कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर लक्षणे असलेल्या सैनिकांची कोरोना चाचणी करण्याचे आणि ते पॉझिटिव्ह आल्यास त्यांना 7 दिवस क्वारंटाईन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गंभीर लक्षणे दिसून आल्यास उपचारांसाठी इस्पितळात दाखल करण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. भारतात कोरोनाच्या वाढत्या धोक्मयाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारांना सतर्क केले असून विविध विभागांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. नवीन वर्ष आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय अधिक सतर्क झाले आहे.









