असोसिएट एडिटर राहुल खिचडी यांचा सल्ला
संहितेएवढीच सादरीकरणातील प्रयोगशीलताही महत्वाची आहे. सादरीकरणात कृत्रिमपणा आणू नका. जे वाटते ते मनापासून सादर करा. प्रयोगशील व्हाल तरच प्रवाहात टिकाल, असा सल्ला एबीपी माझा' वृत्तवाहिनीचे असोसिएट एडिटर राहुल खिचडी यानी येथे दिला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यासकेंद्रातील वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापनशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खिचडी यांनी आपला बेळगावतरुण भारत’ ते एबीपी माझा' हा प्रवास उलगडून दाखविला. पत्रकारितेचे शिक्षण घेऊन आधी बेळगावतरुण भारत’ला उमेदवारी केली. एका अकॅसिडेंटमुळे मला तेथील जॉब सोडावा लागला. 2007 मध्ये एबीपी माझाला असिस्टंटप्रोड्युसर म्हणून जॉईन झाल्याचे खिचडी यांनी सांगितले.
टीव्हीवरचा माणूस आपल्याशी बोलतोय, असे समोरच्याला वाटले पाहिजे. आज आजुबाजूला कोलाहल एवढा वाढलाय की तुमचे लक्ष वेधून घेण्यासाठीप्रयोगशीलता महlवाची ठरणार आहे,असेही ते म्हणाले.
सावंतवाडी / प्रतिनिधी









