घरांमध्ये अँटीबायोटिक पाणी पोहोचतेय
शरीरावर औषधे कमी प्रभावी ठरण्याचा प्रकार
भारत, चीनमध्ये अनेक स्रोतांद्वरारे येणाऱया पाण्याचे प्रक्रिया प्रकल्प अँटीमायक्रोबियल रेजिस्टेंस (एएमआर) निर्माण करणारी मोठी ठिकाणे ठरत असल्याचा खुलासा ‘द लॅन्सेटर प्लॅनेट्री’च्या अहवालाद्वारे झाला आहे. अध्ययनात चीन आणि भारतातील सांडपाणी आणि प्रक्रिया प्रकल्पातून पाण्याचे नमुने मिळविण्यात आले होते.
तपासणीत अनेक ठिकाणच्या पाण्यामध्ये अँटीबायोटिकची उपस्थिती कमाल मर्यादेपेक्षा अधिक आढळली आहे. चीनमध्ये एएमआरची सर्वाधिक जोखीम नळाद्वारे पोहोचणाऱया पाण्यात आढळून आली आहे, यात सिप्रोफ्लोएक्सिनचे प्रमाण खूपच अधिक दिसून आले आहे.

कंपन्यांमुळे वाढतेय प्रदूषण
भारतात शहरी भागांमध्ये पालिका व्यवस्थापन लोकांना नळाद्वारे घरी पाणी पोहोचवित आहे, तेथे प्रक्रिया प्रकल्पात पाणी रुग्णालय, पोल्ट्री फार्म, डेअरी आणि औषध प्रकल्प इत्यादी स्रोतांमधून पोहोचत आहे. या पाण्यात असलेले अँटीबायोटिक जर प्रक्रियेनंतरही कायम राहिले तर पुरवठा होणाऱया पाण्यातही अँटीबायोटिक राहणार आहे. याच्या वापरामुळे एएमआरची जोखीम वाढणार आहे. प्रक्रिया प्रकल्पाच्या वर्तमान व्यवस्था असे घटक दूर करण्यास सक्षम नाहीत. अँटीमायक्रोबियल जिवाणू किंवा फंगी यासारख्या सुक्ष्मजीवांना नष्ट करतो. याच्याशीच निगडित स्थिती आहे एएमआर, यात बॅक्टेरिया अँटीबायोटिक्सशी लढण्याची क्षमता विकसित करून घेतो. यामुळे औषधे निष्प्रभ ठरू लागतात.
वैद्यकीय कचऱयामुळे धोका वाढतोय
देशाच्या जलस्रोतांमध्ये एएमआय वेगाने वाढत असून ही स्थिती चिंताजनक आहे. याच्यामागे पोल्ट्री फार्म आणि दूग्धोत्पादन उद्योग कारणीभूत आहेत, तेथे प्राण्यांना संक्रमणापासून वाचविण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर अँटीबायोटिकचा वापर करण्यात येतो. याच्या वापरानंतर वैद्यकीय कचऱयाची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जात नाही, यातील घटक भूजलात मिसळतात, तर दुसरे कारण जागरुकतेचा अभाव आहे, लोक उपचारानंतर शिल्लक औषधे अशीच नाल्यात किंवा रस्त्याच्या कडेला फेकून देतात. यामुळेही जलप्रदूषण होते, हेच पाणी भूजलात सामावले जात असल्याचे पेयजल सुरक्षाविषयक माजी राष्ट्रीय नोडल अधिकारी सुधींद्र मोहन शर्मा यांनी सांगितले आहे. जलाशये, नद्यांमधील पाण्यात एएमआर वाढले आहे. देशातील 85 टक्के लोकसंख्या भूजलाचा वापर करत असल्याने धोका अधिक आहे.
उपाययोजना
अँटीबायोटिकने प्रदूषित पाण्याच्या समस्येवर सध्या विशेष लक्ष दिले जात नसल्याची स्थिती आहे. याकरता जिल्हा पातळीवर एएमआरची तपासणी करणाऱया प्रयोगशाळा स्थापन होण्याची गरज आहे. तसेच सर्व संस्थांसह नागरिकांसाठी वैद्यकीय कचऱयाच्या विल्हेवाटीसंबंधी योग्य दिशानिर्देश जारी करण्यात यावेत. वैद्यकीय कचरा नाल्यांमध्ये फेकला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब इत्यादी राज्यांच्या डेयरीबहुल भागांमध्ये अँटीबायोटिक रेजिस्टेंसचे हॉटस्पॉट शोधले जावेत. घरांमध्ये वापरली जाणारी आरओ सिस्टीम देखील एएमआर रोखू शकत नाही.









