वृत्तसंस्था/ मुंबई
येथे सुरू असलेल्या पश्चिम भारत बिलीयर्डस् आणि स्नुकर चॅम्पियनशीप स्पर्धेत ओएनजीसीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पंकज अडवाणीने तसेच बिपीसीएलच्या एस. श्रीकृष्णाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे.
बेंगळूरच्या पंकज अडवाणीने रेल्वेच्या सिद्धार्थ पारेखचा 65-14, 71-60, 63-8, 64-20 अशा 4-0 अशा फ्रेम्स्मध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. चेन्नईच्या श्रीकृष्णाने रेल्वेच्या मोहम्मद हुसेन खानवर 4-0 अशा फ्रेम्समध्ये मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. रेल्वेच्या फैजल खानने मुंबईच्या रियान आझमीवर 4-2 अशा फ्रेम्समध्ये मात करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. सौरभ कोठारीने पश्चिम बंगालच्या सकलेन मुस्ताकचा 4-1 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.









