प्रतिनिधी/सिंधुदुर्ग
Adv. Vikram Bhangle honored in the world shooting competition!
आंतरराष्ट्रीय शुटींग फेडरेशन अध्यक्षांच्या उपस्थितीत करण्यात आला सन्मान
भोपाळ येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘आय. एस. एस. सी. वर्ल्डकप’ या जागतिक नेमबाजी स्पर्धेत ऑर्गनायझेशन कमीटी सदस्य आणि पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावल्या बद्दल, सावंतवाडीचे सुपुत्र व आंतरराष्ट्रीय शुटींग पंच आणि प्रशिक्षक अॅड. विक्रम भांगले यांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आंतर राष्ट्रीय शुटींग फेडरेशनचे अध्यक्ष तुकीनो रोस्सी यांच्या प्रमुख उपस्थितीत, नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रनिंदर सिंग यांच्या हस्ते गौरवचिन्ह देऊन हा सन्मान करण्यात आला. यावेळी मध्यप्रदेश शासनाच्या क्रीडामंत्री श्रीमती यशोधराराजे सिंथीया उपस्थित होत्या.जागतीक नेमबाजी स्पर्धेचे ज्या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते त्या भोपाळ येथील मध्यप्रदेश शुटींग अॅकॅडमीत हा सोहळा पार पडला.

सुप्रिम कोर्ट दिल्ली येथे वकीली करणारे अॅड. विक्रम भांगले हे सावंतवाडीने सुपुत्र असून, जागतिक नेमबाजी क्षेत्रात उत्तम प्रशिक्षक, उत्तम पंच व जागतिक स्पर्धा आयोजनाचा मोठा अनुभव पाठीशी असणारे अनुभवी ऑर्गनायझर म्हणून त्यांना ओळखलं जातं. काही वर्षापूर्वी भारतीय नेमबाजी संघाला प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केल्यानंतर त्यानी या क्रीडा प्रकारात पंच व ऑर्गनाझर म्हणून काम करायला सुरुवात केली. याच भूमिकेतून त्यांनी आतापर्यंत विविध देशांत संपन्न झालेल्या तब्बल ४ जागतिक नेमबजी स्पर्धा, सॅफ गेम, कॉमनवेल्थ गेम, एशियन गेम आशियाची स्पर्धा व देशांतर्गत पार पडलेल्या अनेक राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धामध्ये पंच व आयोजक म्हणून उत्तम कामगिरी बजावली. नुकत्याच भोपाळ येथे पार पडलेल्या नेमबाजी वर्ल्डकप् मध्ये आयोजन कमिटी सदस्य आणि पंच या दुहेरी भूमिकेत त्यांनी उत्तम कामगिरी बजावत ही वर्ल्ड कप स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल त्यांना हा विशेष गौरव करण्यात आला.









