झोळंबे गावची कन्या
ओटवणे । प्रतिनिधी
झोळंबे गावची कन्या अँड सौ. रेवती सुधाकर गवस आणि आता देवगडची स्नुषा सौ. रेवती वैभव कदम हिची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची स्विय सहाय्यकपदी (पि ए) नियुक्ती झाली आहे. राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल ॲड. सौ. रेवती गवस – कदम यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. बीकॉम एलएलबीचे शिक्षण घेतलेल्या अँड सौ. रेवती गवस – कदम यांनी चार वर्षे सिटी सिव्हिल कोर्टात हायर स्टेनो म्हणून काम केले. या परीक्षेला संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण २००० उमेदवार परीक्षेस बसले होते. त्यातुन पहिल्या दोन परिक्षेत १६० उमेदवार निवडण्यात आले. दुसऱ्या परीक्षेसाठी ३६ उमेदवार निवडण्यात आले. तर शेवटच्या तिसऱ्या परीक्षेसाठी १५ उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यात अँड सौ. रेवती गवस – कदम यांचा ९ वा क्रमांक आला.