Adv Gunaratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद 2 वर्षांसाठी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलकडून रद्द करण्यात आली आहे. वकिली गणवेशात आंदोलन केल्यामुळे डॉ. सुशील मंचरकर यांनी बार काऊन्सिलकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत कारवाई झाली असून सदावर्ते यांची सनद 2 वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. बार कौन्सिलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यापुढे 2 वर्षासाठी कोणाचीही बाजू मांडू शकणार नाहीत.
बार कौन्सिलच्या नियमानुसार वकिलीचा गणवेश परिधान करून सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी आहे. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबत सुनावणी झाल्यानंतर आझाद मैदानावर आंदोलन करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली होती. इतकेच काय गणवेश परिधान केलेला असतानाही गुणरत्न सदावर्ते हे त्या ठिकाणी नृत्य करताना निदर्शनास आले होते.आझाद मैदानावरील उल्लंघन वकील सुशील मंचरकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी थेट बार कौन्सिल कडे तक्रार केली होती. याच तक्रारीची दखल घेऊन गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बार कौन्सिलने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








