जोरदार प्रचारफेरी : इतर समाजबांधवांचाही उत्स्फूर्त पाठिंबा
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहरासोबतच उत्तर मतदारसंघातील ग्रामीण भागातूनही म. ए. समितीचे उमेदवार अॅड. अमर येळ्ळूरकर यांना तुफान प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून संपूर्ण मराठा समाज एकवटला आहे. आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या म. ए. समितीने इतर समाजांनाही सन्मानाची वागणूक दिल्यामुळे इतर समाजबांधवांचाही मोठ्या प्रमाणात अॅड. अमर येळ्ळूरकरांना प्रतिसाद मिळू लागला आहे.
शनिवारी सकाळच्या सत्रात रामनगर, गँगवाडी, व•रवाडी, अशोकनगर, धर्मनाथ सर्कल परिसरात प्रचार करण्यात आला. मराठा समाजासह या परिसरात मराठी भाषिक मोठ्या संख्येने असल्याने यावेळी म. ए. समितीचा विजय निश्चित असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी महिला व युवक मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोहन हावळ, रोहित हावळ, शरद हावळ, कुशल लेंगडे, विशाल लेंगडे, सोमेश लेंगडे, विनायक चौगुले, ओमकार भोपाल, मोहन हुलजी, चेतन हुलजी, अमोल मनवाडकर, रवी पाटील, प्रेम जाधव, सुमित शहापूरकर, श्लोक शिंदे, प्रेम चौगुले, ओम घोडके, प्रथमेश बाचुळकर, गौरव घोडके यांसह नागरिक उपस्थित होते.
सायंकाळनंतर यमनापूर येथे जोरदार प्रचार करण्यात आला. शहरासह ग्रामीण भागातही अॅड. अमर येळ्ळूरकरांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. म. ए. समितीचा विजय निश्चित असून मराठी भाषिकांनी एकत्रितरित्या मतदान करण्याचे आवाहन अॅड. येळ्ळूरकर यांनी केले. यावेळी प्रवीण पिंगट, विशाल कोनेवाडी, परशराम पाटील यांसह मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते.
आजची प्रचारफेरी
रविवारी सकाळी मतदारसंघातील विविध कार्यकर्ते व मंडळांच्या गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत. तर सायंकाळी 5 वाजता रामतीर्थनगर परिसर व कणबर्गी परिसरात अॅड. अमर येळ्ळूरकर प्रचार करणार आहेत.









