आचरा | प्रतिनिधी
आचरा येथील “वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रा.बि.सह.पतसंस्था मर्या. आचरा” यांच्यातर्फे दिला जाणारा “कै.श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार ” यावर्षी “ॲड.देवदत्त दिगंबर परूळेकर”;वेंगुर्ला यांना जाहीर झाला आहे.या संस्थेचे माजी (संस्थापक ) अध्यक्ष कै.श्रीकांतभाई सांबारी यांच्या स्मृती चिरंतन जतन करण्यासाठी गेल्यावर्षीपासून हा पुरस्कार दिला जात आहे.सन्मानपत्र,सन्मानचिन्ह शाल,श्रीफळ आणि रोख रू.५००० असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याचे वितरण बुधवार दि.२५ सप्टें. रोजी डॅफोडिल्स रिसाॅर्ट आचरा येथे होणा-या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे चेअरमन मा.मंदार श्रीकांत सांबारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.









