सावंतवाडी : प्रतिनिधी
माणगाव येथील दत्तमंदिर न्यासतर्फे सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड . बाळाजी रणशूर यांचा न्यासाचे माजी अध्यक्ष रा. ज. गणपत्ये यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सौ रणशूर, न्यासचे अध्यक्ष सुभाष भिसे, सचिव दीपक साधले, उपाध्यक्ष महेश बांदेकर, विश्वस्त चव्हाण, नाईक, गुरु गणपत्ये आधी उपस्थित होते. वकील रणशूर हे गेली १५ वर्षे दत्त मंदिर न्यासचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहत आहेत.









