समर्थनगर परिसरात झंझावाती प्रचार
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने अॅड. अमर येळ्ळूरकर यांच्या रुपाने एक प्रामाणिक व सीमाप्रश्नासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघातून अॅड. अमर येळ्ळूरकरांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मराठी भाषिकांमधून मिळत असलेल्या प्रेमामुळे यावेळी शहराला मराठी आमदार मिळेल, असा विश्वास अॅड. येळ्ळूरकर यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. शुक्रवारी सकाळी समर्थनगर परिसरात जोरदार प्रचार करण्यात आला. पदयात्रा काढून घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर देण्यात आला. जुना पी. बी. रोड येथील रेणुकादेवीचे पूजन करून प्रचाराला प्रारंभ झाला. म. ए. समितीने यावेळी एकच उमेदवार दिल्याने मतदारांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. घरोघरी आरती ओवाळून अॅड. येळ्ळूरकरांचे स्वागत केले जात आहे. समर्थनगर परिसरात मराठी भाषिकांचे प्राबल्य अधिक असल्यामुळे एकमुखी पाठिंबा देण्यात आला. या प्रचारफेरीमध्ये संयुक्त समर्थनगर युवक मंडळ, शिवजयंती युवक मंडळ, बालशिवराय युवक मंडळ, पंचमंडळी, सामर्थ्य महिला मंडळ, रेणुकादेवी महिला मंडळ यासह इतर महिला मंडळांच्या सदस्या सहभागी झाल्या होत्या. मुरली जांगळे, वसंत हलगेकर, संजय राऊत, बाळू किल्लेकर, संजय पाटील, महेश पाटील, प्रकाश पाटील, रविंद्र हुलजी, संजय चतुर, मारुती कोंडुस्कर, राम कटारे, मंजुनाथ पालटेकर, विनायक हुलजी, वैशाली हुलजी यांसह इतर उपस्थित होते.
सदाशिवनगरमध्ये तुफान प्रतिसाद
दुपारच्या सत्रात सदाशिवनगर, जाधवनगर या मराठी परिसरात घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला. बेळगाव शहराला मराठी आमदार मिळणार असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. कोणत्याही परिस्थितीत अॅड. येळ्ळूरकरांना विजयी करणारच, असा निर्धार यावेळी केला. समितीचे ज्येष्ठ नेते एन. बी. खांडेकर यांनी जल्लोषपूर्ण वातावरणात येळ्ळूरकर यांचे स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते.
आजचा प्रचाराचा मार्ग
शनिवारी सकाळी धर्मनाथ सर्कल येथून प्रचारफेरीला सुरुवात होईल. रामनगर, गँगवाडी, व•र छावणी, सुभाषनगर, अशोकनगर या परिसरात पदयात्रा काढत प्रचार केला जाणार आहे.









