गल्लोगल्ली मतदारांच्या गाठीभेटी : युवकांचा भरघोस सहभाग
बेळगाव : मराठी अस्मितेसाठी म. ए. समितीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रीय पक्षांकडून मराठी भाषिकांना वेळोवेळी डावलले जात असून मराठी भाषिकांना स्वाभिमान हा म. ए. समितीतच मिळतो. त्यामुळे सर्व मराठी भाषिकांनी भगव्या झेंड्याखाली एकत्रित येऊन अॅड. अमर येळ्ळूरकरांना विजयी करावे. यामुळे समितीला आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी मिळेल, असा विश्वास मराठी भाषिकांनी मंगळवारी रात्री टिळक चौक येथे आयोजित कोपरा सभेमध्ये व्यक्त केला. बुधवारी अॅड. येळ्ळूरकर यांच्या प्रचारफेरीला जत्तीमठ येथून सुरुवात झाली. केळकरबाग, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली, नार्वेकर गल्ली, कंग्राळ गल्ली या परिसरात प्रचारफेरी काढून घरोघरी म. ए. समितीलाच मत घालण्याची याचना करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र चौकात सकाळच्या प्रचारफेरीची सांगता झाली. गल्लोगल्ली अॅड. अमर येळ्ळूरकरांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आमदार म्हणून अॅड. येळ्ळूरकर करणार, असा निर्धार युवकांनी केला. य् ाावेळी रेणू किल्लेकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, सरिता पाटील, संज्योत बांदेकर, गणेश बाडीवाले, उमेश जाधव, यल्लाप्पा रेडेकर, शोभा अळवणी, ज्योती सुतार, किरण बडवाण्णाचे, गजानन पाटील, अभिजित अष्टेकर, नरेश जाधव, सुहास चौगुले, सागर पवार, विलास कंग्राळकर यांच्यासह इतर उपस्थित होते.









