मालवण । प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील ॲड ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, मालवण शाखेतील खात्यात दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी सुमारे ₹40,000/- (चाळीस हजार रुपये) इतकी रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा झाली.सदर रक्कम पश्चिम बंगाल येथील व्यक्तीची होती.सदर रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाल्याचे लक्षात येताच, ॲड ऐश्वर्य मांजरेकर यांनी तात्काळ बँकेच्या शाखा व्यवस्थापकांकडे लेखी अर्ज सादर करून ती रक्कम मूळ खातेदारास परत करण्याची विनंती केली.ही रक्कम परत करून मांजरेकर यांनी सामाजिक जबाबदारीचे व प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .









