नवी दिल्ली :
निवडणूक सुधारणा आणि पारदर्शकतेचे पक्षधर जगदीप छोकर यांचे वयाच्या 80 व्या वर्षी दिल्लीत शुक्रवारी निधन झाले आहे. आयआयआयएम-अहमदाबादमध्ये प्राध्यापक राहिलेले छोकर यांनी 1999 साली स्वत:च्या सहकाऱ्यांसोबत असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर)ची स्थापना केली होती. दोन दशकांपेक्षा अधिक काळापर्यंत त्यांनी भारतीय राजकारणात उत्तरदायित्व आणि पारदर्शकता आणण्यासाठी संघर्ष केला. एडीआरच्या पुढाकारावरच सर्वोच्च न्यायालयाने 2002 साली ऐतिहासिक निर्णय देत निवडणूक उमेदवारांनी स्वत:ची संपत्ती, शैक्षणिक पात्रता, नोंद गुन्ह्यांचा तपशील सादर करणे अनिवार्य केले होते.









