अधिवेशनामुळे रात्रभर हेतेय रस्त्यांची स्वच्छता : शहरवासियांची झोपमोड
प्रतिनिधी/ बेळगाव
सर्वसामान्यांना मुलभूत सुविधा देण्याबाबत दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला अधिवेशन आले की शहर स्वच्छतेचे वेध लागतात. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी दुभाजकांना रंगरंगोटी करणे, रस्त्यावरील ख•s बुजविणे, डांबरीकरण करणे, झुडपे आणि तण काढून टाकणे, अशा कामांना वेग आला आहे.
प्रामुख्याने अधिवेशन जसजसे जवळ येवू लागते तसतसे प्रशासनाला शहर स्वच्छ करण्यासाठी जाग येते. एरव्ही ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, रस्त्यावरील ख•s यांचा सामना नागरिकांना करतच रहावा लागतो. पाणीटंचाईचे संकट तर बेळगावकरांच्या मानगुटीवरच बसले आहे. मात्र या सर्वांकडे प्रशासन फार गांभीर्याने लक्ष देत नाही.
हे सर्व काम तर सुरू आहेच. परंतु दिवसा सुरू असणारे काम आता रात्रीही सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या झोपेचे मात्र खोबरे होत आहे. रस्ता स्वच्छ करण्यामुळे सर्वत्र धूळ उडत असून त्याचा त्रास नागरिकांना होतो आहे. शिवाय रस्ता स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनमुळे सतत झोपमोड होत आहे. अधिवेशन होईपर्यंत नागरिकांसाठी या सर्व त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.









