तालुक्यातील ग्रा.पं.मध्ये नियुक्ती गरजेची : अनेकजण ठाण मांडून कार्यालयातच : अधिकाऱयांच्या दुर्लक्षामुळे बदलीसत्रही रखडले
प्रतिनिधी /बेळगाव
तालुका पंचायतचा कारभार सुधारणार तरी कधी? असा सवाल वारंवार विचारला जात आहे. परिणामी तालुका पंचायतचा कारभार पीडीओंच्या जीवावरच चालत असून पीडीओंना ग्राम पंचायतला पाठविल्यास येथील कारभार राम भरोसे राहणार आहे. त्यामुळे अनेक पीडीओंचे फावत असून ठाण मांडून कार्यालयातीलच कारभार सांभाळण्यावर ते भर देत आहेत. अधिकाऱयांच्या दुर्लक्षितपणाचा फटका आणि त्याचा फायदा कार्यालयातील अनेक कर्मचाऱयांना होत आहे. या साऱया प्रकारामुळे अधिकाऱयांच्या बदलीसत्राचेही घोंगडे भिजत आहे.
एकदा का तालुका पंचायत कार्यालयात नोकरी लागली तर ना बदली ना काम, असा प्रत्येकाचा समज झाला आहे. काही प्रामाणिक कर्मचारी वगळता इतरांची मात्र रोजच चैनी सुरू आहे. तालुका पंचायतच्या महसूल विभागात तर दररोज चांदी आहे. कारण या ठिकाणी नेमण्यात आलेल्या वरि÷ अधिकाऱयांची बदली होत असली तरी कनि÷ अधिकारी कंत्राटदारांशी हातमिळवणी करत आपला भत्ता आणि कमिशन घेत निवांत आहेत. याकडे तालुका पंचायतच्या अधिकाऱयांचे साफ दुर्लक्ष झाले आहे.
मागील अनेक वर्षांपासून आपल्या खुर्चीला चिकटून बसणाऱया या अधिकाऱयांच्या बदलीसाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्याचा काहीच उपयोग होत नाही. काहींनी तर आमदारांकरवी थेट अधिकाऱयांनाच आव्हान दिले आहे. त्यामुळे त्यांची बदली करण्यास अधिकारीही धजत नाहीत. तसे पाहता तीन वर्षांतून एकदा तरी अधिकाऱयांची बदली होणे गरजेचे आहे. मात्र, केवळ तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱयांची बदली होते. कार्यालयातील कर्मचारी निवांत आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीसाठी कधीच प्रयत्न होणार नाहीत. कारण अधिकारीही झोपेचे सोंग घेत असल्याचाच हा प्रकार आहे.
विकासाला खो घालण्याचा प्रयत्न
सध्या 5 ते 6 पीडीओ तालुका पंचायतमध्ये काम करत आहेत. त्यांच्यावरच तालुका पंचायतचा डोलारा आहे. त्यांच्यावर कामाचा ताण असल्याचे व्यवस्थापकही सांगत आहेत. मात्र, त्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी पाठवून देण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. परिणामी पीडीओंची कमतरता ग्राम पंचायतींना आहे. मात्र, त्या ठिकाणी न पाठविता तालुका पंचायतमध्ये ठेवून घेऊन विकासाला खो घालण्याचा हा प्रयत्न आहे. काही प्रामाणिक पीडीओंना ग्राम पंचायतमधील राजकारणामुळे तालुका पंचायतमध्ये बसावे लागत आहे. अशा परिस्थितीतही कामाचा ताण त्यांनीच घ्यावा आणि उर्वरित पीडीओंनी मनमानीपणे राहावे, याला सर्वस्वी वरि÷ अधिकाऱयांचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
याला काय म्हणावे?
ता. पं.मधील महसूल विभागातील एका महिलेने कंत्राटदारांशी संधान बांधून माया जमविण्यावर भर दिल्याचे प्रकरण चर्चेत आहे. परिणामी अनेक अधिकाऱयांना रकमेचे आमिष दाखवून कामे आपल्याकडे ओढून घेण्यासाठी कंत्राटदार धावपळ करत असतात. अशा वातावरणामुळेच ता. पं.मधील महिलेला हाताशी धरून आणि तिच्याच खुर्चीवर बसून चेक काढण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे आता जणू कंत्राटदारच तालुका पंचायतचे नोकरदार म्हणून काम करत असल्याचे दिसून येत आहे. अशा बाबतीत सदर महिलाही सहकार्य करते, याला काय म्हणावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे वरि÷ अधिकाऱयांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
डोळय़ावर पट्टी बांधल्याप्रमाणे अधिकाऱयांची अवस्था
बेळगाव तालुका पंचायतमधील कारभाराला जनता वैतागली आहे. दरम्यान, आता सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे अधिकाऱयांचे फावत आहे. अधिकारी बिनधोकपणे नोकरीपेक्षा घरी राहणे किंवा पाहणी दौऱयात मग्न आहेत. त्यामुळेच 5 ते 6 पीडीओंवर ता. पं.चा कारभार पाहण्याची वेळ आली आहे. अशामुळे कामासाठी गेलेल्या नागरिकांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यातच अधिकारी धन्यता मानत आहेत. हा सारा कारभार वरि÷ अधिकाऱयांच्या नजरेला येत असला तरी डोळय़ावर पट्टी बांधल्यासारखी त्यांची अवस्था आहे. याकडे आता जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.









