रिजॉर्टवर चालला बुलडोझर : बांधकाम जमीनदोस्त
वृत्तसंस्था/ रामपूर
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मोहम्मद आझाम खान यांच्या हमसफर रिजॉर्टवर पुन्हा एकदा प्रशासनाकडून बुलडोझरने कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळीच बुलडोझर या रिजॉर्ट परिसरात पोहोचला. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय जमिनीवर निर्माण करण्यात आलेली भिंत आणि भवन जमीनदोस्त केले आहे. तर सप नेते ओमेंद्र चौहान यांनी या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे.
रामपूर जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी कारवाईची नोटीस बजावली होती. ही कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. न्यायालयाने अवैध कब्जा हटविणे आणि नुकसान भरपाईचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत प्रशासनाने शासकीय भूमीला अतिक्रमणमुक्त केले आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे आझम खान यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.









