स्मार्ट सिटीच्या कामांची दैना, खोदलेले ख•s, चेंबरही उघडे

पणजी : जसा जसा पावसाळा तोंडावर येतो, तशी पणजीवासीयांची धाकधूक वाढते. यंदा तर ती अधिकच वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शहरात स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत सुरू असलेली विविध कामे आणि ही वेळेत पूर्णत्वास यावीत याकडे प्रशासनाकडून होत असलेली डोळेझाक हेच आहे. शहरातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांची अवस्था बकाल झाली असून, पूर्ण रस्तेस या कामांमुळे वेठीस धरले जात आहेत. सुरू असलेली कामे सद्य:स्थितीत अर्धवट असल्याने नेमकी ती कधी पूर्णत्वास येणार हे ठोसपणे एकही अधिकारी व कंत्राटदार सांगण्याचे धारिष्ट्या दाखवत नाहीये. यावरूनच नियोजनशून्य कारभारामुळे पणजीवासीयांसाठी यंदाचा पावसाळा हा अधिकच त्रासाच ठरणार आहे. दोनच दिवसांपूर्वी उद्रार गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत कामांचा आढावा घेताना सांतईनेज येथील प्रकल्पाला अचानक भेट देऊन कामाच्या स्थितीबाबत आढावा घेतला. परंतु त्या ठिकाणी सुरू असलेल्या कामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत कंत्राटदाराला सुरू असलेली कामे नक्की कधीपर्यंत पूर्ण होतील, अशी विचारणा केली असता कंत्राटदार ठोस सांगू शकला नसल्याने या कामाबाबत ठोस उपाययोजनाच नसल्याचा पर्दापाश झाला आहे.

थोड्याच दिवसांवर मान्सून येऊन ठेपला आहे. अशातच राजधानीत सुरू असलेली बहुतांश कामे खोळंबलेली आहेत. मिळेल त्या ठिकाणी खोदकाम केलेली आहेत. ही कामे जाग्यावर येण्यासाठी आवश्यक गती नसल्याने अगदी संथस्वऊपात सुरू आहेत. थ्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पणजीवासीयांना जोखीम पत्करूनच घालवावा लागणार आहे. दरवर्षी पणजी शहरातील अनेक भागात पाणी साचते, अनेक घरात तुंबते, फुटपाथवरही गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागते. आता अनेक प्रकारची कामे ही अर्धवट सुरू असल्याने यंदाच्या पावसाळ्यात पणजीवासीयांचा श्वास कोंडणार आहे. त्यामुळे प्रशासन आतातरी जागे होईल का? असा सवाल पणजीवासीयांतून विचारला जात आहे. सांतीनेज परिसर व इतर ठिकाणी नियोजन न करताच रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. बहुतांश ठिकाणी या कामामुळे सांडपाण्याची वाहिनी फुटून पाणी उघड्यावर वाहत आहे. यामध्ये मळा-सांतीनेज परिसर पुढे आहे. सांडपाणी उगडयावर वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाहीजणांना धुळीचा त्रास झाल्याने अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. धुळीमुळे व रस्ते बंद असल्याने व्यावसायिकांवरही मोठा परिणाम झालेला आहे.

मंत्र्यांनी जबाबदारी झटकली, दाद मागावी कुणाकडे?
सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी स्मार्ट सिटीच्या कामाबाबत जबाबदारी झटकल्याने पणजीवासीयांनी दाद मागावी कुणाकडे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मंत्र्यांच्या या व्यक्तव्यामुळे विरोधी पक्षाकडून अजूनतरी आवाज उठवला गेला नसला तरी आम आदमी पक्षाचे नेते अॅङ अमित पालेकर यांनी सरकारला जबाबदार धरले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, महापौर व सरकारी अधिकाऱ्यांना शहरात सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करण्यात काही अडचण येत असल्यास खुल्या व्यासपीठावर चर्चा करावी, असे आवाहनही त्यांनी दिले आहे.

पणजी शहरात विविध कारणांसाठी खोदकाम केलेले आहे. घेल्या अनेक महिन्यांपासून विविध कामे सुरू असल्याने याचा परिणाम जनजीवनावर झालेला आहे, होत आहे. ही कामे वेळेत पूर्ण होण्याबाबत ना कंत्राटदार, ना प्रकल्प अधिकारी, ना सरकार गंभीर आहे. धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेच. परंतु घरातील टिव्ही व वातानुकूलित यंत्रणेतही बिघाड होत आहेत. वर्षभरापूर्वी बसविण्यात आलेली वातानुकूलित यंत्रणा (एसी) यामध्ये धूळ साचून ती जाम होण्याच्या घटना घडली आहे. असे प्रकार वारंवार होत असल्याने यामुळे आर्थिक भुर्दंड बसत आहे. घराची खिडकी, दरवाडे उगडावेत तर धुळीचा त्रास होतोय. त्यामुळे कडक उन्हाळ्यात दिवस कसा ढकलावा हेच समजत नाही. थ्यामुळे शहरातील सुरू असलेली कामे मान्सूनपूर्वी पूर्णत्वास आणावीत, अशी आमची अपेक्षा आहे.









