दसरा-दिवाळीमध्ये महाद्वार रोड परिसरातील रस्ते खुले करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे यंदा बॅरिकेटिंगमुक्त महाद्वार रोड पाहायला मिळणार आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने अंबाबाई मंदिर रोड परिसरात बॅरिकेटिंग लावून सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जातात. याचा परिणाम व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होतो. यंदा तरी यावर मार्ग निघावा यासाठी कोल्हापूर सराफ व्यापारी संघ व महाद्वार रोड व्यापारी असोसिएशन मार्फत तीन दिवसांपासून बैठकांचे आयोजन केले होते. या बैठकाीत प्रशासनाने दसरा-दिवाळीमध्ये महाद्वार रोड परिसरातील रस्ते खुले करण्यास परवानगी दिली.
या मार्गावर दुचाकी व रिक्षाला परवानगी
भाऊसिंगजी रोड, गुजरी ते रंकाळा रोड, महाद्वार रोड (बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी) ताराबाई रोड, जोतिबा रोड, राजोपाध्ये बोळ, बाबूजमाल रोड (अंबाबाई मंदिर परिसर) या परिसरामध्ये दुचाकी व रिक्षाला परवानगी असेल. त्याचबरोबर व्यापाऱ्यांच्या मालाची ने-आण करण्यासाठी रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत करता येईल, असेही ठरवण्यात आले.
आज सराफ व्यापारी संघाच्या कार्यालयात जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे, करवीर तहसीलदार शीतल भांबरे-मुळे, शहर पोलिस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, वाहतूकच्या स्नेहा गिरी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता नारायण भोसले, अतिक्रमण विभागप्रमुख सचिन जाधव यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









