अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी : एएसआय सर्वेक्षणाची सुनावणी पूर्ण.3 ऑगस्टला न्यायालयाचा निर्णय.निकाल येईपर्यंत सर्वेक्षणावर बंदी
वृत्तसंस्था /लखनौ
ज्ञानवापी प्रकरणातील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. याप्रकरणी 3 ऑगस्टला न्यायालय निकाल देणार आहे. उच्च न्यायालयाने तोपर्यंत सर्वेक्षणाला स्थगिती दिली असून आता अंतरिम आदेश 3 ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे. म्हणजेच एएसआय सर्वेक्षणावरील स्थगिती 3 ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे. ज्ञानवापी एएसआय सर्वेक्षण प्रकरणाची सुनावणी गुरुवारी अलाहाबाद उच्च न्यायालयात झाली. सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. मुख्य न्यायमूर्ती प्रितिनकर दिवाकर यांनी 3 ऑगस्ट रोजी निकाल दिला जाणार असल्याचे सांगितले. यासोबतच हा अंतरिम आदेश 3 ऑगस्टपर्यंत कायम राहणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर निकाल राखून ठेवत पुढील आठवड्यात निर्णय देण्याची तयारी दर्शवली.









