Rahul Gandhi News : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना गुजरात हायकोर्टाने दिलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली.यानंतर राहुल गांधी यांचे खासदारकी पद त्यांना बदाल करावे असे पत्र काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांना दिले.
दरम्यान आज लोकसभा सचिवालयाकडून खासदारकी बहाल करण्यात आली. लोकसभा सचिवालयाने यासंबधीची अधिसूचना जारी केली. यानंतर आज राहुल गांधी लोकसभेत दाखल झाले. राहुल गांधी यांना खासदारकी बहाल होताच राजकीय वर्तुळात अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. सोशल माध्यमातूनही त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. दरम्यान आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ट्विट करत अभिनंदन केले. यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि स्वत:चा फोटो शेअर केला आहे.आम्ही सत्य,लोकशाही आणि संविधानासाठी लढत राहू! असा संदेशही आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
काय म्हटलय ट्विटमध्ये..
राहुल गांधी यांचे अभिनंदन! न्यायाच्या मार्गाने पुन्हा एकदा लोकसभेत जाण्याचा तुमचा मार्ग मोकळा झाला.आपल्या देशासाठी आणि सत्यासाठी लढणाऱ्यांना गप्प करण्याच्या कारवाया सारं जग पाहत आहे.असल्या कृत्यांमुळे भारताची बदनामी होत असून आम्ही ह्या दडपशाही विरोधात लढा देत राहू! आम्ही सत्य, लोकशाही आणि संविधानासाठी लढत राहू! अस आदित्य ठाकरे यांनी म्हटलयं.