Satara : एका आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यासाठी शिवसेनेला दोन दिग्गज नेत्यांना विधान परिषदेवर घ्यावे लागले.त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान देणे हे हस्यास्पद आहे.शिंदे साहेब लांब राहिले.त्यांनी आमच्या पाटण विधानसभा मतदारसंघात येऊन निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंना दिले आहे.शिवसेनेच्या युवासेनेचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले होते. मख्यमंत्र्यांनी वरळी मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावे, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यावर आज साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंना खुले प्रतिआव्हान दिले आहे.
शंभूराज देसाई म्हणाले की,आदित्य ठाकरे सातत्याने टीका करत असतात.आता त त्यांनी वरळी मतदारसंघातून एकनाथ शिंदेंनी निवडून येऊन दाखवावे,असे आव्हान दिले आहे.मुळात आदित्य ठाकरेंना निवडून यायला तेथील विद्यमान आमदार सुनील शिंदेंचे तिकिट कट करावे लागले होते.त्यावेळी सुनील शिंदेंना व सचिन अहिर या दिग्गजांना विधानपरिषदेवर घ्यावे लागले.
एका आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यासाठी दोन आमदारक्या पक्षाला द्याव्या लागल्या. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देणे हस्यास्पद आहे. शिंदे साहेब लांब राहू देत आम्ही कार्यकर्ते आहोत. पुन्हा निवडणुक लावायची तयारी असेल तर त्यांनी पाटणमध्ये येऊन विधानसभेची निवडणूक लढवावी, तसेच निवडून येऊन दाखवावे. ज्यांच्या मागे ५० आमदार व १३ खासदार आहेत, त्यांना आव्हान देण्याची भाषा करु नये. त्यांनी पाटणमध्ये येऊन निवडणूक लढवावी व निवडुन येऊन दाखवावे, असे आवाहन मंत्री देसाई यांनी दिले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









