ऑनलाईन टीम/ तरुण भार
मुंबई: राज्यसभेतील आणि विधानपरिषदेतील निकालानंतर मविआत अलबेल सुरु असल्याची चर्चा होती. दरम्यान कालपासून एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने शिवसेनेत दुफळी पडणार या चर्चेला उधान आले असतानाचा आज पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर हॅण्डल वरून मंत्री पद काढून टाकलं आहे. आदित्य ठाकरे यांनी शरणागती पत्त्करली अशी चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा सुरु झाली आहे.
हेही वाचा- राखेतून जन्म घेण्याची शिवसेनेची ताकद – संजय राऊत
शिवसेनेतील नाराज आमदारांचा तोटा हा शिवसेनेला होणार असल्याचे बोलले जात आहे, त्यातच मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आतापर्यंत ४० आमदार आहेत. त्यातच गुलाबराव पाटील हेही गुवाहाटीला गेले आहेत. यामुळे मविआ कोसळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने चालला आहे असे सूचक ट्विट केले आहे. यामुळे आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजीनामा देणार का? शिवसेना भाजपसोबत जाणार का? हे पाहावे लागणार आहे.
Previous Articleआरटीओचे दोन महिन्यांचे उद्दिष्ट पूर्ण
Next Article अळंबी प्रशिक्षण बेरोजगारांना आधार









