महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात होत आहे. अधिवेशनाला जाण्यापुर्वी शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधून मुंबईतील फर्निचर घोटाळा प्रकरणात लोकायुक्तांकडून चौकशी व्हायला पाहीजे असे म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री आपल्य़ा मित्रांना वाचवण्य़ासाठी फक्त चौकशी समिती नेमत आहेत, पण त्यावर कोणतीच कारवाई करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
सरकारवर हल्ला करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबई महानगर पालिकेतील फर्निचर घोटाळा प्रकरणाची चौकशी ही लोकायुक्तांमार्फतच झाली पाहीजे. कोणत्याही समितीकडून ही चौकशी व्हाय़ला नको. य़ापुर्वीही अनेक चौकशी समित्या नेमल्य़ा गेल्या पण त्यातून काहीच निष्पण्ण होत नाही. मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी अशा चौकशा करत असतात. त्यामुळे याची लोकायुक्तांमार्फत चौकशी व्हावी.”
पुढे बोलताना त्यांनी बंडखोर आमदारांची खिल्ली उडवली. ते म्हणाले, “शिवसेनेचे बंडखोर आमदार गेले बर्षभरापासून मंत्रीपदासाठी आस लावून बसले आहेत. पण त्यांना काही मंत्रीपद मिळाले नाही. विधानसभा परिसरात त्यांचे चेहरे पाहण्याजोगे झाले आहेत.” असेही त म्हणाले.
बंगळूर येथे आज होणाऱ्या विरोधी पक्षांच्या ऐक्यावर भाष्य करताना ते म्हणाले, “जे लोकशाहीसाठी आणि देशाच्या हितासाठी काम करत आहेत त्यांना आमचा नेहमीच पाठींबा आहे. पाटण्य़ानंतर बंगळूरमध्ये होणाऱ्या या भाजपविरोधी ऐक्यासाठी आम्ही हजर राहणार आहोत.” असेही ते म्हणाले.