रत्नागिरी प्रतिनिधी
तेलही गेलं तूपही गेलं हाती आलं धपाटणं, अशी अवस्था आदित्य ठाकरे आणि त्यांच्या इतर मंडळींची झाली आहे. अशी खरमरीत टीका रत्नागिरी- भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी केली ते आज रत्नागिरीत बोलत होते.
शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत जाऊन जी चूक केली. ती आता निस्तरण्याच्या पलीकडे गेली आहे. उद्धव ठाकरे आणि मंडळींना आपले डूबते जहाज पाहताना घालमेल होतेय, त्यामुळे काहीतरी कारण सांगून एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोप करणे एवढेच काम ही मंडळी करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी जे साहस दाखवलं, त्यामुळे या दुःखातून बाहेर पडण्यासाठी हा सर्व आटापिटा आहे असेही प्रमोद जठार पुढे म्हणाले.
आदित्य यांचा वय अनुभव पाहता त्यांना फर्स्टटेशन आलय, त्यातून ते बाहेर येत नाहीयेत त्यासाठी या साऱ्या चर्चा घडवून आणल्या जात आहेत. पुढे महाविकास आघाडीवर बोलताना प्रमोद जठार म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडी आली आहे, महाविकास आघाडीला आता मोठे भगदाड पडणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे जहाज बुडतानाची ही आरडा ओरड केली जात आहे. आदित्य ठाकरे जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरे संजय राऊत यांची आउट घटकेची ओरड आहे. लवकरच महाविकास आघाडीचा अस्त झालेला दिसेल. त्यामुळे जहाज बुडणार हे आता समजल्यामुळे ही आरडा ओरड आहे.
प्रमोद जठार पुढे म्हणाले की ठाकरे कुटुंबाचं कुठलंही झाड नसताना, कुठलाही शेत नसताना कुठलाही उद्योग नसताना ते एवढं कसं फोफावलंय यावर सुद्धा एक चौकशी समिती नेमायला हरकत नाही. तुमची चौकशी लावली तर तुम्हाला पळता होईल थोडी होईल असे ही शेवटी प्रमोद जठार म्हणाले.









