वार्ताहर/नंदगड
खानापूर येथील समर्थ इंग्रजी मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी आदिती ज्ञानेश्वर नाडगौडा हिने देश पातळीवरील कराटे स्पर्धेमध्ये कुमितेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळविले. तसेच कटामध्ये काश्यपदक पटकाविले. स्पर्धा बेंगलोर येथे रविवार दि. 12 रोजी संपन्न झाली. आदिती हिला कराटे प्रशिक्षक सेनसाय हरिष सोनार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका दिव्या नाडगौडा व इतर शिक्षकांचे प्रोत्साहन मिळाले. शाळेचे संस्थापक चेअरमन व विद्यमान सचिव डॉ. डी. ई. नाडगौडा यांची कन्या तसेच शाळेचे संचालक डॉ. एन. एल. कदम यांची ती नात होय.









